Mulund मध्ये परदेशी चोरांनी लुटले ATM | Crime News Update | Lokmat Marathi Latest News

2021-09-13 1

मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील दोघा चोरांना नवी दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. तक्रारदारांचा आकडा १०० पेक्षा जास्त असल्याचे पुढे आले होते. मुलुंड येथील एटीएममध्ये सीसीटीव्ही लावून पासवर्ड हॅक करण्यात आला होता. त्याच्या माध्यमातून जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली होती. ही रक्कम रात्री ११.५९ ते १ वाजताच्या दरम्यान काढण्यात येत होती. दरम्यान, फसवणूक झाल्याचे समजाताच अनेकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी नवघर पोलिसांचं तपास पथक नवी दिल्लीला रवाना झाले होते. मुलुंड नवघर रोड परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये हा कार्ड क्लोनिंगचा प्रकार घडला आहे. सोमवारी ३५ खातेदारांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले. मंगळवारी तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे.दरम्यान तक्रारदारांचा आकडा १०० हून अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ही शक्यता खरी ठरलेय.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews